

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री मा ना जयकुमारजी गोरे साहेबांच्या संकल्पनेतून शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आडाचीवाडी ग्रामपंचायतीने हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आडाचीवाडीच्या मसुदा समितीची बैठक सहकार नगर पुणे येथे पार पडली. सायंकाळी ७ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री ११ वाजता संपन्न झाली.अभियानाच्या जवळपास सर्वच मुद्द्यांवर ग्रामपंचायतीने ठोस कामे केलेली आहेत. गेली १ तप सुरू असलेल्या विकासाच्या जनआंदोलनामुळे आडाचीवाडी ग्रामपंचायत जेतेपदास गवसणी घालणार यात शंका नाही