ग्रामपंचायत आडाचीवाडी

मा. ना जयकुमार गोरे साहेब यांनी आडाचीवाडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आढावा बैठक व विकासकामांची पाहणी केली

मुख्यमंत्री समद्ध पंचायतराज अभियान आढावा बैठक विकासकामांची पाहणी -२ मार्च २०२६
केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबबून विकासाचा प्रवाह प्रत्येक गाव-खेड्यात नेण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपूर्ण महाराष्ट्रत राबवण्यात आले आहे. आडाचीवाडी ता. पुरंदर येथे आढावा बैठक आणि विकासकामांची पाहणी करण्यासाठी मा. ना. जयकुमार गोरे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून आडाचीवाडी आणि गुरोळी येथे झालेली विविध विकास कामे, स्मशानभूमी, नाना नानी पार्क एसी जिम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प पाणीपुरवठा योजना तसेच जलसंधारणाची अनेक कामे, सिमेंटचे पानंद रस्ते अशा विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली . या सर्व विकास कामांबद्ल गावातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि पुणे जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन केले. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आडाचीवाडी महाराष्ट्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास गोरेसाहेब यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत आडाचीवाडी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading